Wednesday , July 16 2025
Breaking News

निपाणीत रविवारी मोफत पोटविकार गॅस्ट्रोस्कोपी शिबिर

Spread the love

प्रकाश शाह : महावीर आरोग्य सेवा संघातर्फे आयोजन
निपाणी : येथील मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखान्याच्यावतीने रविवारी (ता. 10) रोजी येथील व्यंकटेश मंदिरात मोफत पोटविकार व गॅस्ट्रोस्कोपी तपासणी व सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात मुंबईचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ब्रीच कॅन्डी हॉस्पीटल व जसलोक हॉस्पीटल मुंबईचे सुप्रसिध्द पोटविकार तज्ञ डॉ. शरद सी. शाह, कोल्हापूर येथील डॉ. विवेकानंद कुलकर्णी, मुंबईचे डॉ. प्रसन्ना शरद शाह, डॉ. शांताराम बोरकर व कोल्हापूरचे डॉ. आदित्य कुलकर्णी हे या शिबीरात रुग्णांची तपासणी करणार असल्याची माहिती मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाशभाई शाह मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शाह पुढे म्हणाले, महावीर आरोग्य सेवा संघाने आतापर्यंत 1 लाख 26 हजार रुग्णांची सेवा केली आहे. 30 महिन्यात 110 वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना मदत देण्याचे काम केले आहे . कोरोनाच्या पहिल्या लाटेत 30 हजार मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. निराधारांना जवण दिले. आस्था फौंडेशनकडून मिळालेल्या रुग्णवाहिकेतून 600 जणांना सेवा देण्यात आली आहे. सवलतीत रक्तांच्या तपासणी, आरटीपीसीआर प्रमाणपत्र, सॅनिटायझर फवारणी असे उपक्रम या प्रमाणात राबवून बंद काळात महावीर आरोग्य सेवा केंद्रातून 24 तास सेवा देण्यात आली आहे . दुसर्‍या कोरोनाच्या लाटेवेळी 30 हजार लोकांना मोफत अन्नदान केले.
16 ऑक्सीजन मशिनची उपलब्धता करून दिली. महिन्याकाठी 5 रुग्णांना दत्तक घेत त्यांना लागणारी सर्व औषधे मोफत देण्यात येत आहेत. लवकरच महावीर सेवा संघाची स्वःवास्तू होणार आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील राज्यातील वेगळा क्रम निर्माण होणार आहे.
सामाजिक उद्देश ठेवूनच स्व. प्रसादभाई दोशी यांच्या वाढदिवसानिमित्त पोटविकार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी 7.30 ते सायं 4.30 वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी 800 रुग्णांची गॅस्ट्रोस्कोपी करण्यात येणार आहे. रुग्णांनी आपले याअगोदरचे सर्व तपासणीचे कागद घेवून महावीर आरोग्य सेवा केंद्र डॉ. वखारिया व डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाश शाह यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. सतिश वखारिया, प्रतिक शाह, राजेश शाह, जवाहर शाह, सागर शाह, सुबोध मेहता, मिलींद मेहता, राजू मेहता, संदीप माने, रितेश शाह, प्रणव शाह, सुजीत स्वामी यांच्यासह संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्त्वाची बैठक

Spread the love  निपाणी : म. ए. समिती निपाणी व म.ए. युवा समिती निपाणी यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *