बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात पाच जण घर कोसळून जागीच ठार झाले आहेत तर दोघांचा उपचाराला घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले होते त्यात दोघा जखमींना हिरेबागरवाडी येथील इस्पितळात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.
सात मयतापैकी खनगावी कुटुंबातील सहा जण आणि शेजारच्या कुटुंबातील एक असे सात जण या घटनेत दगावले आहेत.
हिरेबागेवाडी पोलिसांनी व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक विजय शिंनूर यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य केले. बुधवारी झालेल्या पावसाने घर कोसळले असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
गंगाव्वा भिमाप्पा खनगावी (वय 50), सत्यव्वा अर्जुन खनगावी (वय 45), पूजा अर्जुन खनगावी (वय 8), सविता भिमाप्पा खनगावी (वय 28), काशव्वा विठ्ठल कोळेपन्नावर (वय 08), लक्ष्मी हणमंत खनगावी (वय 15) आणि अर्जुन हणमंत खनगावी (वय 45) सर्वजण राहणार बडाल अंकलगीचे रहिवाशी अशी मयतांची नावे असून आहेत.
Check Also
तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी प्रकाश मरगाळे तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची बिनविरोध निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव शहरातील प्रतिष्ठित श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची चेअरमन व व्हाईस …