Sunday , December 22 2024
Breaking News

पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंते सी. डी. पाटील सेवानिवृत्त

Spread the love

विविध ठिकाणी काम : शासनाच्या कोट्यावधी निधीची केली बचत

बंगळुरू: कर्नाटक- महाराष्ट्र पूरपरिस्थिती नियंत्रणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या सहा आंतरराज्य मंत्र्यांबरोबर चर्चा करताना सी. डी. पाटील यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी.

निपाणी : हिरण्यकेशी, मार्कंडेय प्रकल्प, दूधगंगा प्रकल्प, रायबाग जी. एल. बी. सी. उपविभाग, पीडब्ल्यूडी, लघुपाटबंधारे अशा विविध विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्य करुन पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता पदावरुन जबाबदारी पूर्ण करून बेनाडी येथील रहिवाशी सी. डी. पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी अभ्यासूवृत्तीने आपली वेगळी छाप त्यांनी पाडली होती. त्यांनी कर्नाटक राज्य सरकारला कोट्यवधीच्या निधीची बचत करून दिली आहे. मार्च १९८५ ते सप्टेंबर १९८७ पर्यंत पुण्याच्या बी. जी. शिर्के कंपनीत डिझाईन इंजिनियर म्हणून केले.  सप्टेंबर १९८७ ते जून १९९४ पर्यंत कर्नाटक सरकारच्या पाटबंधारे खात्यामध्ये उपविभाग भातांबा (तालुका भालकी) येथे सहाय्यक अभियंता म्हणून काम केले. २००४ ते २००९ पर्यंत निपाणी येथे दूधगंगा प्रकल्पावर सहाय्यक अभियंता म्हणून काम केले. २००९ ते २०१२ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिकोडी येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता, २०१३ मध्ये रायबाग जी. एल. बी. सी. योजनेवर सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून काम केले. २०१३ ते २०१६ अखेर चिकोडी येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात सहाय्यक कार्यकारी अभियंता २०१६ ते १८ पर्यंत लघु पाटबंधारे खात्यात अथणी येथे काम केले. २०१८ जुलै ते २०२१ सप्टेंबर पर्यंत जी. आर. बी. सी. सी. विभाग ४ येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम केले. जुलै २०१८ ते सप्टेंबर २०२१ काळात ते हिडकल डॅम येथे अधीक्षक अभियंता, जमखंडी, अथणी, बेळगाव येथेही प्रभारी अधीक्षक अभियंते म्हणून काम केले आहे. कौजलगी येथे काडा विभागात कार्यकारी अभियंता, चिकोडी विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २००१ ते सन २०२० पर्यंत कर्नाटक महाराष्ट्र  सरकारच्या मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत सी. डी. पाटील यांनी हिरीरीने भाग घेत कर्नाटक सरकारचे हित जोपासले आहे. आता पाटबंधारे विभागामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सेवा करुन सी. डी. पाटील निवृत्त झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या

Spread the love    राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *