बेळगाव : बेळगावात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचामेळावा घेण्यात आला. कोरोना महामारीमुळे 2 वर्षानंतर झालेल्या या मेळाव्यात नोटरी वकिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्नाटक स्टेट नोटरी असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट नोटरी असोसिएशनच्या वतीने बेळगावातील वकील संघटनेच्या समुदाय भवनात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचा मेळावा घेण्यात आला.
राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष एस. कोटेश्वर राव यांनी दीप प्रज्वलनाने या मेळाव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर नोटरी वकिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
मेळाव्यासंदर्भात माहिती देताना राज्य नोटरी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, सध्या नोटरी वकिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खासकरून बेळगावात नोटरी वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध नाही. त्यामुळे बेळगावात बेंगळूर, धारवाडच्या धर्तीवर स्वतंत्र नोटरी भवन उभारण्याची आवश्यकता आहे. नोटरी वकिलांच्या विकासासाठी संघटना स्थापन केली आहे. प्रत्येक सदस्यांकडून 5 हजार रु. जमा करून मृत नोटरीच्या कुटुंबियांना मदतनिधी देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात अखिल भारतीय नोटरी असोसिएशनचे सचिव असिफ अली, मनोहर जिरगे, व्ही. रंगरामु, अशोक परेप्पण्णावर, रावसाहेब पाटील, रमेश देसाई, होनप्पा नसलापुरे, जयराज रंगण्णावर, आर. एस. ममदापुर, विजय महेंद्रकर आदी उपस्थित होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …