बेळगाव : वन्यजीव सप्ताहानिमित्त बेळगाव वन विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनतेत वन्य प्राण्यांच्या विषयी जागरूकता, छायाचित्र प्रदर्शन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन वन्यजीव सप्ताहात करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताह समारोपाच्या निमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि वन खात्याला विविध कार्यात सहकार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
समारोप कार्यक्रमाचे आयोजन महात भवन येथे आयोजित करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सांजिद शेख, मलिक अर्जुन जोटेवर, मोहम्मद किल्लेदार आणि सर्पमित्र रामा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, विभागीय वन अधिकारी हर्ष बानू, सहाय्यक वन अधिकारी एम.कुशनाळ, सहाय्यक वन अधिकारी डॉ. मिशालाई, आरएफओ शिवानंद मगदुम, वन अधिकारी विनय गौडर, वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta