येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री जोतिर्लिंग कमिटीतर्फे आयोजित ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रम भक्तीभावाने मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्लिंग कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा खेमणाकर हे होते. प्रारंभी दुदाप्पा बागेवाडी यानी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.
प्रभावळ गाड्याचे पुजन ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील व उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर यांच्या हस्ते झाले. दिपप्रज्वलन ज्योतिर्लिंग कमिटीचे उपाध्यक्ष मनोज परिट यांच्या हस्ते झाले. प्रभावळ कार्यक्रमचे पुजन उद्योजक नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्योतिर्लिंग अभिषेक मनोहर गोरल यांच्यावतीने करण्यात आला. प्रभावळचे पुजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे बेळगांव जिल्हाध्यक्ष किरण गावडे व बेळगांव शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभावळ गाड्याची मिरवणूक गावातील सैनिक भवनपासून श्री ज्योतिर्लिंग मंदिरापर्यत काढण्यात आली. त्यानंतर मंदिरामध्ये पुजाअर्चा करुन तिर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास सेक्रेटरी भोमानी गोरल, खजिदार केशव पाटील, सुरेश कुट्रे, मलाप्पा गोरल, नागेंद्र कुट्रे, जोतिबा पाटील, कृष्णा पाटील, गणपत हट्टीकर, बाळू कंग्राळकर, रमेश कणबरकर, सचिन देसाई तुळजाई, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, दयानंद उघाडे, राकेश परिट, राजु डोण्याणावर, मनिषा घाडी, राजकुवर पावले, शालन पाटील, रेणुका मेलगे, शांता मासेकर, लक्ष्मी कणबरकर, सोनाली येळ्ळूरकर आदींसह गावातील भाविक उपस्थित होते. गोरल यांनी आभार मानले.
Check Also
सायकल फेरीत सामील झालेल्यांवर कडक कारवाई करणार : मंत्री सतीश जारकीहोळी
Spread the love बेळगाव : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने १ नोव्हेंबर …