बेळगाव : हिरा टॉकीज नजिक खुल्या जागेतील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून आठ जुगार्यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार (ता. 8) रात्री मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 85 हजार 890 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मार्केट पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणार्या हिरा टॉकीज नजिक खुल्या जागेत खुले आम जुगार खेळला जात आहे. अशी खात्रीलायक माहिती मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकार्यांसह सदर जुगार अड्ड्यावर सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी आठ जण जुगारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून 85 हजार 890 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
