बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळेच जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व शेतकर्यांतर्फे सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वन खात्याच्या अधिकार्यांना खानापूर येथे निवेद देण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने जंगली डुक्करांकडून पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असून शेतकर्यांनी अनेकदा मागणी करून देखील वनखाते याकडे लक्ष देत नसल्याने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील आदींनी केले आहे.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …