बेळगाव : दीड वर्ष भाविकांना दर्शनासाठी बंद असलेले बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीचे मंदिर 27 सप्टेंबर पासून खुले करण्यात आले. मंदिर खुले करण्यात आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात एक लाख 58 हजार भाविकांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता नवरात्र उत्सव काळात श्री रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. काल शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्याची माहिती, रेणुका देवी मंदिराचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी दिली आहे.
27 सप्टेंबर पासून श्री रेणुकादेवी मंदिर भाविकांना खुले करण्यात आल्यानंतर, कर्नाटकासह महाराष्ट्रातील भाविकांनी देवी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. नवरात्र उत्सव काळात डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. प्रशासनाने मंदिर केवळ दर्शनासाठी खुले केले असले तरीही इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. भाविकांना केवळ दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. सामाजिक आंतर राखत आणि मास्क लावूनच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. प्रचंड गर्दी असतानाही भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझेशन केले जात आहे.
नवरात्र उत्सव काळात देवी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असताना मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेत व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसराचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जात आहे, अशी माहितीही रवी कोटारगस्ती यांनी दिली आहे.
Check Also
सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट
Spread the love बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, …