चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने मागणी
बेळगाव : जिल्हा चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने हॉटेल मिलनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून भालचंद्र जारकीहोळी यांना पद द्यावे अशी मागणी केली. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेहरू उरलेकर यांच्यासह चलवादी समाजाचे अनेक आमदार भाजपात आहेत. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा त्यांना कॅबिनेट मंत्री पद द्यावे अशी मागणी करण्यात आली.
येत्या 11 नोव्हेंबर रोजी ओनके ओबवा यांची जयंती आचरणात आणण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सरकारला आदेश दिले आहेत. त्यामुळे चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. सरकार वेगवेगळ्या समाजाला उभारी देण्यासाठी वेगवेगळ्या योजनेमार्फत त्यांची अभिवृद्धी करत आहे. मात्र हरिजन, चलवादी समाजासाठी या योजना असून देखील त्यांना याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चलवादी अभिवृद्धि निगम मंडळाची स्थापना करावी. तसेच येणार्या बजेटमध्ये सदर समाजासाठी दहा टक्के आरक्षण ठेवावे अशी मागणी पत्रकार परिषदेत चलवादी महासभेचे अध्यक्ष दुर्गेश मेस्त्री यांनी केली.
