बेळगाव (वार्ता) : शहापूर अळवण गल्ली येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. स्वच्छता अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये नगरसेवक रवी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम हाती घेण्यात आले.
प्रारंभी संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी यांनी रवी साळुंखे, संजय पाटील, देमट्टी, हेल्थ इन्स्पेक्टर कुंभार मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर प्राचार्य एम. एच. पवार यांचे स्वागत प्रा. जी. जी. होसूर यांनी तर प्रकाश नंदीहळ्ळी यांचे स्वागत प्रा. वाय. टी. मुचंडी यांनी केले.
स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती किती महत्त्वाची आहे हे रवी साळुंके, संजय पाटील त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे नेतृत्व रवी साळुंखे यांनी केले नाथ पै सर्कलमधून गोवावेस, अळवण गल्ली भागातून फिरून महाविद्यालयात रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये संस्थचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी, प्राचार्य एम. एच. पवार, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. व्ही. कुलकर्णी यांनी केले तर अभियान यशस्वी करण्यासाठी प्रा. के. एल. शिंदे, प्रा. आर. व्ही. हळब, प्रा. मयूर नागेनहट्टी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …