Sunday , December 22 2024
Breaking News

‘अरिहंत’ने शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले : संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील

Spread the love

अरिहंत दूध संघाकडून 5.2 लाख बोनस वाटप
निपाणी : ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या दुग्ध व्यवसायाला उर्जितावस्था देण्या बरोबरच दूध उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची स्थापना करण्यात आली. या दूध संघामार्फत गेल्या 15 वर्षापासून दूध उत्पादकांना खास दिवाळी निमित्त बोनस या रूपाने त्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच दूध ग्राहकांना ही भेट वस्तू देण्यात येत आहे. यावर्षी या दूध संघाकडून 5 लाख 2 हजार रुपयांचा बोनस वाटप केले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न, रावसाहेब पाटील यांनी दिली.
आज बोरगाव येथे अरिहंत दूध संघामार्फत सुमारे 500 हून अधिक दूध उत्पादकांना बोनस तसेच 280 दूध ग्राहकांना भेट वस्तू वितरण करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बोनस वाटप करण्यात आला. दूध संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवठे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात, संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील व विद्यमान संचालक युवानेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी दूध उत्पादकांना या ठिकाणी बोनस वितरण करण्यात येते. दूध उत्पादकांना दूध उत्पादकांचे आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्यांना वेळेवर कर्ज देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपण बिनव्याजी 22 लाख रुपयांचे ऍडव्हान्स दिले आहे. त्याचबरोबर म्हैस खरेदीसाठी 5 लाखपर्यंत कर्ज वितरण केले आहे. जवळच्या रत्नाकर बँकेच्या वतीने 25 सभासदांना प्रत्येकी 1 लाखप्रमाणे म्हैस खरेदीसाठी कर्ज वितरण केले आहे. यामध्ये सभासदांना 35 हजारांचा अनुदान देण्यात आलेला आहे. अहवाल सालात दूध संघात म्हशीचे 02,37,973 लिटर दूध संकलन करण्यात आले आहे. तर 63,287 लिटर गाईचे दूध संकलन करण्यात आले आहे. एकूण 3,01,261 लिटर दूध संकलन झाले असून सभासदांना 5,02,315 रुपयांचे आपण बोनस वितरण केले आहे. अहवाल सालात दूध संघास 04 लाख 38 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून दूध उत्पादकांच्या दूध वाढीसाठी दरवर्षी विविध उपक्रम हाती घेत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे चेअरमन मायगोंडा पाटील, व्हा. चेअरमन शिवाजी तोडकर, संचालक शितल हवले, रमेश माळी, रावसाहेब पाटील, हिराचंद चव्हाण, सिकंदर अपराज भारती सावळवाडे, वैशाली बुलबुले, जयपाल कोरवी, अभयकुमार करोले, राजू बागे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या

Spread the love    राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *