मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी : ऊस वाहतूक करणार्या वाहनधारकांना मार्गदर्शन
निपाणी : वाढत्या अपघाती घटना रोखण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, विशेष करून ऊस गळीत हंगाम काळात ऊस वाहतूक करणार्या वाहनांच्या अपघाती घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबरोबरच आपल्या वाहनाच्या मागील व पुढील बाजूस रिफ्लेक्टरची सोय करून घ्यावी, असे आवाहन सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी केले. निपाणी पोलीस सर्कलच्यावतीने दोन दिवसात सुमारे 200 वाहनांना रिप्लेक्टर व रेडियम पट्टी बसविण्यात आली असून यापुढील काळातही ही मोहीम आठवडाभर चालणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक वाहनधारकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिवयोगी म्हणाले, ऊस वाहतूक वाहन धारकांच्या बरोबरच कारखानदारांनीही या काळात घडणार्या अपघाती घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिवयोगी यांनी केले.
यावेळी येथील हालशुगर कारखाना कार्यस्थळ तसेच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणार्या ऊस वाहतूक वाहनाना रिप्लेटवर, रेडियम पट्टीची सोय पोलीस प्रशासनच्यावतीने करण्यात आली. दोन दिवसांपासून सुमारे 20 हुन अधिक पोलिस कर्मचारी या मोहिमांमध्ये सहभागी झाली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसूर यांनी दिली.
बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक, आनंद कॅरीकटी यांनी, निपाणी परिसर हा सीमाभाग आहे. त्यामुळे या भागातून राष्ट्रीय महामार्गासह इतर मार्गावरून ऊस वाहतूक करणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे पाहता अशा ऊस वाहतूक करणार्या वाहनधारकांनी तसेच कारखाना प्रशासनाने पोलीस प्रशासनाने केलेल्या आव्हानाला सहकार्य करावे असे सांगितले.
यावेळी ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी यासह धोक्याच्या वळणावर व ठिकाणी रिप्लेक्टर व तशा प्रकारच्या सूचना तसेच रेडियम बोर्ड उभारणी करून अपघाती घटना रोखण्यासाठीची खबरदारी घेण्यात आली.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …