Thursday , June 20 2024
Breaking News

बँकेच्या माध्यमातून सक्षम उद्योजक बना

Spread the love

पुष्पा किशोर : एसीएसटी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन
निपाणी : भारत सरकारने एससी एसटी मागासवर्गीय यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी व इंडस्ट्रियल निर्माण करून स्वत:च मालक होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तुम्ही देखील प्रयत्न करून बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन सक्षम उद्योजक बना व उद्योग द्या असे प्रतिपादन युनियन बँकेच्या जॉईन डायरेक्टर पुष्पा एन. किशोर यांनी केले. युनियन बँक ऑफ इंडिया बेळगाव व छडखउ, व जिल्हा औद्योगिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने वाल्मिकी भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन आयोजित निपाणी परिसरातील नवं उद्योजकासाठी मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष हिटलर माळगे होते.
यावेळी जिल्हा औधुगिक केंद्र बेळगावचे जाऍट डायरेक्टर भिमापा एन. एम. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रवीण मुधोळ यांनी स्वागत तर रामाराव यांनी प्रास्ताविक केले.
पुष्पा एन. किशोर म्हणाल्या, केंद्र सरकारने विविध योजना निर्माण केलेल्या असून त्या सर्व योजनांची माहिती व मार्गदर्शन करून उद्योजक बनण्याला प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी लाभार्थींनी जिद्द चिकाटी आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी. शासनाकडून उद्योग व्यवसायासाठी सबसिडी दिली जाते. केवळ सबसिडीसाठी व्यवसाय न करता आत्मविश्वासाने विविध व्यवसाय करता येतात. त्यासाठी सर्वांनी नवनवीन उद्योग व्यवसायाच्या वाटा शोधल्या पाहिजेत. हिटलर माळगे यांनी, विविध योजना आपल्याला माहिती नाहीत त्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यावयाचा, आणि यशस्वी उद्योजक बनायचे, यासाठी युनियन बँक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फाऊंडेशन नेहमी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी या कार्यक्रमास मोहन घस्ते, बाळासाहेब थोरात, रमेश कांबळे, अजित कांबळे, मारुती मधाळे, सचिन कांबळे, वैभव माने, धनश्री माने, अन्नपूर्णा दामननवर, श्रीदेवी कांबळे, स्मिता चव्हाण, सुधाकर ऐवाळे, मिलिंद घाटगे, चेतन शिंदे, निता भालेराव, त्यांच्यासह युनियन बँकेचे कर्मचारी, बेळगाव जिल्हा औद्योगिक केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी एसएसटी नागरिक उपस्थित होते. अजित कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

जत्राटवेस- लखनापूर पुलाचे काम करा

Spread the love  नागरिकांचे निवेदन; पालकमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : जत्राटवेस लखनापूर केसरकर मळा मार्गावरील ओढ्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *