Friday , December 27 2024
Breaking News

रेल्वेत नोकरीच्या अमिषाने तरुणांची 18 लाखांची फसवणूक, शिप्पूरच्या बंटी-बबलीची करामत

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नेसरी परिसरातील दोघांना 18 लाख 8 हजार 996 रुपयांचा गंडा घालणार्‍या शिप्पूर तर्फ नेसरी येथील दोघा पती-पत्नी विरोधात नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नोकरीच्या शोधात असणार्‍या अनेक गरजूवंतांची फसवणूक करणारी बंटी आणि बबलीची जोडी सध्या नेसरी भागात वावरत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या जोडीच्या कारनाम्याचे अनेकजण शिकारही झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात संजीवनी प्रभाकर कांबळे उर्फ संजीवनी निलेश पाटणे (सध्या राहणार पुणे) व प्रभाकर जिवबा कांबळे (दोघेही शिपुर तर्फे नेसरी) या बंटी-बबली विरोधात नेसरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या जोडीने ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीच्या अमिषाने लाखो रुपयांचा चुना लावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, संजीवनी प्रभाकर कांबळे उर्फ संजीवनी निलेश पाटणे व प्रभाकर जिवबा कांबळे दोघेही राहणार शिप्पूर तर्फ नेसरी या बंटी-बबलीच्या जोडीने आपल्या घरी येऊन तुला रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावतो असे सांगून 1 जानेवारी 2016 पासून ते 3 मे 2021 पर्यंत 11 लाख 59 हजार रुपये रोख व बँक ट्रान्सफरद्वारे घेवून फसवणूक केल्याची फिर्याद नेसरी पोलिसात गोपाळ विठ्ठल टिक्का (वय 30) रा. हेळेवाडी, ता. गडहिंग्लज यांनी दाखल केली आहे.
तसेच स्वप्निल विजय पाटील (वय 28) या हेळेवाडीच्या तरुणास देखील रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावतो अशी बतावणी करून संजीवनी कांबळे व तिचा नवरा प्रभाकर कांबळे या दोघांनी 6 लाख 49 हजार 996 रुपये रोख रक्कम घेऊन नोकरी न लावूताच फसवणुक केली असल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आणखी किती लोकांना या बंटी-बबली जोडीने फुस लावून लुबाडले आहे हे तपासाअंती समोर येईल.
त्यानुसार नेसरी पोलिस ठाण्यात कलम 420, 34 प्रमाणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संजीवनीला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास पो. नि. अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. माने तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

विषबाधेने दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत..

Spread the love  कोल्हापूर जिल्ह्यातील घटना कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या कारणामुळे दोन घटनांमध्ये पाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *