बेळगाव : लष्करात सेवा बजावणार्या शहीद जवानाच्या कुटुंबाला राज्य सरकारने दोन एकर जमीन दिली आहे. मात्र त्याचा फायदा घेण्यासाठी आम्हाला एनओसीची गरज आहे. जिल्ह्यातील तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्षभरापासून आमचा छळ करत असल्याचा आरोप शहीद जवानाच्या कुटुंबियांनी केला आहे.
सौंदलगा गावचे संजय वसंतराव देसाई भारतीय सैन्यात श्रीलंकेत सेवा बजावीत होते. सेवा बजावत असताना ते शहीद झाले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने सौंदलगा गावात दोन एकर जमीन देऊ केली होती. हि जमीन कसण्यासाठी बँक सुविधेचा लाभ घेऊन बोअरवेल खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यासाठी सरकारच्या एनओसीची गरज आहे. परंतु सदर एनओसी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत शहीद जवानांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
शहीद जवानांच्या कुटुंबातील सुजाता देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, सरकारने दिलेल्या जमिनीवर पीक घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून यासाठी बोअरवेलची व्यवस्था करण्याचा विचार आहे. बोअरवेलच्या खोदकामासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरु असून यासाठी एनओसीची गरज आहे. गेल्या 5 वर्षांपासून एनओसीची मागणी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांकडे करण्यात येत असून संबंधितांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. आमच्यावर छळ होत असल्याचा आरोप सदर महिलेने केला असून तातडीने एनओसी देण्याची विनंती जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सुजाता देसाई यांनी दिली.
यासंदर्भात शहीद जवानांचे वडील वसंतराव देसाई बोलताना म्हणाले, भारतीय सैन्यदलात सेवा बजाविताना माझा मुलगा शहीद झाला असून त्याच्या सन्मानार्थ सरकारने आम्हाला दोन एकर जमीन दिली आहे. वर्षानुवर्षे तहसीलदार कार्यालयात एनओसीसाठी मागणी करण्यात येत आहे. परंतु अद्याप एनओसी देण्यात आली नसून तातडीने एनओसी देण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
Check Also
बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Spread the love पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …