आरोग्य अधिकारी दिलीप पवार : मानकापूर येथे ज्ञान विकास केंद्राचा वर्धापन
निपाणी : पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत होते. पण यातून बाहेर येऊन त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून अनेक सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. धर्मास्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थाकडून महिलांच्या आर्थिक उन्नती बरोबरच त्यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी विविध योजना राबवित आहेत. अशा सेवा संस्थामुळेच सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, असे मत माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पवार यांनी व्यक्त केले. माणकापूर येथे धर्मस्थळ संघाच्या ज्ञान विकास केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
केंद्राच्या अध्यक्षा कविता लोंढे यांनी प्रास्ताविकात केंद्रामार्फत गेल्या वर्षभरापासून विविध सामाजिक उपक्रम आपण हाती घेत आहोत. कोरोना वारियर्स यांचा सत्कार, स्वच्छता, जागृती अभियान, महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आयोजन केले आहे. पुढील काळातही महिलांच्या उन्नती बरोबरच कलाक्षेत्राला एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
निपाणी तालुका योजना अधिकारी जाफर अत्तार यांनी, धर्मस्थळ संघाकडून मानकापूर व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी वृक्षारोपण, गरीब मुलांना आर्थिक सहाय्य, दिव्यांगाना सायकल, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, यासह विविध उपक्रम राबवून आदर्श समाज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षिका सरला बेनुलकर, ग्रां. प. सदस्या राजश्री चौगुले, केंद्राच्या प्रमुख श्रद्धा सुतार, केंद्रीय उपाध्यक्ष नंदा कांबळे, सेवा प्रतिनिधी ज्योती ढवळे, रेखा कांबळे, अलमीना नाईकवाडे, वर्षा छत्रे, वैशाली निनगुरे, रूपाली माने, मंगल चौगुले, यांच्यासह ज्ञानेश्वरी, वैभव लक्ष्मी, अंबिका, दुर्गामाता या मंडळाच्या कार्यकर्त्या व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Check Also
शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे मागे घ्या
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत शेंडूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : सरकारने शेतकऱ्यांच्या …