Sunday , October 13 2024
Breaking News

साखर आयुक्त कार्यालयावर रयत संघटनेचा धडक मोर्चा

Spread the love

राजू पोवार यांचा पुढाकार : विविध मागण्यांचे दिले निवेदन
निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटनेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या मनमानी विरोधात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. अनेक कारखाना एफआरपी रक्कम देण्यात विलंब करत आहेत. अनेकांची मागील वर्षीची थकबाकी अद्याप बाकी आहे.
यावरुन रयत संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या वरील मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा चिकोडी जिल्हा आरोग्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेतकर्‍यांचा विविध मागण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तवर मोर्चा काढल्यानंतर पोवार बोलत होते.
साखर आयुक्तांनी रयत संघटनेच्या आंदोलकांना भेट दिली. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयात पदाधिकारी समवेत जवळपास चार तास प्रदिर्घ चर्चा केली. यावेळी ठिकठिकाणच्या संघटना पदाधिकार्‍यांनी आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी, अनेक साखर 100 किलोची 50 किलो केली आहे. ती पूर्ववत 100 किलो देण्यात यावी. याशिवाय वीज मंडळाच्या गलथान निपाणी तालुक्याचे अनेक शेतकर्‍यांचा ऊस जळाला आहे. त्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी. यासह विविध मागण्या असून कारखानदारांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल. वरील मागण्या मान्य न झाल्यास बेळगाव येथे होणार्‍या अधिवेशनात जोरदार आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू पोवार यांनी शेवटी दिला.
यावेळी राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, जयश्री गुरन्नावर तसेच निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, शाखा अध्यक्ष सुभाष नाईक राजू नाईक, सुनील गाडिवड्डर यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे

Spread the love  पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *