Tuesday , February 27 2024
Breaking News

अवकाळीमुळे कारखान्यांचा पाय खोलात

Spread the love

शेतकर्‍यांसमोर अतिरिक्त ऊसाचे संकट : उभ्या ऊसाची टांगती तलवार
निपाणी : दोन-तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस आणि ऊसाचे दर वाढल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात हंगामात ऊसाची लागवड केली आहे. सीमाभागातील यावर्षीच्या कार्यक्षेत्रातील सर्वच साखर कारखान्यांकडे तब्बल 30 हजार हेक्टरची विक्रमी नोंद झालेली आहे. तर अवकाळी पडणार्‍या पावसामुळे व यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊन साखर कारखान्यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. तर ऊस उभाच राहण्याच्या भितीची टांगती तलवार शेतकर्‍यांच्या डोक्यावर लटकत आहे.
सततची अतिवृष्टी आणि महापूर असतानाही कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील कार्यक्षेत्रातील शेतकरी मागील 4 वर्षांपासून ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. काही वर्षात झालेला समाधानकारक पाऊस, शंभर टक्के भरलेले धरण उच्चपातळी बंधारे, भर उन्हाळ्यात वाहणार्‍या वेदगंगा आणि दूधगंगा नदी यामुळे विहीर, विंझण विहिरींची भूजलपातळी वाढली आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. आठ वर्षापासून सर्वच नद्यांना सतत पाणी आहे.
ऊसक्षेत्र वाढल्याने यंदाच्या गाळप हंगामात परिसरातील कारखान्यांकडे जवळपास 30 हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. या कारखान्यांची दर दिवसाची गाळप क्षमता अनुक्रमे 5 हजार, 7 हजार, दीड हजार असे एकूण 13 हजार 500 मेट्रिक टन आहे. कारखाने दरदिवशी अंदाजे 12 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करतात. यंदाचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने 6 महिने चालला तरी 30 हजार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल का नाही? याबाबत शासंकता आहे.
शेतकर्‍यांना सरासरी हेक्टरी शंभर ते 125 टन उसाचे उत्पादन निघाले आहे. हेच उत्पादन पुढील वर्षी ग्राह्य धरले तर कार्यक्षेत्रात एकूण अंदाजे 28 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांसमोर पुढील वर्षी अतिरिक्त ऊसाचे संकट उभा राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेटकेन बंदी आवश्यक
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कारखान्यांनी बाहेरच्या कार्यक्षेत्रातून गेटकेनचा ऊस मोठ्या प्रमाणात आणला आहे. पुढील वर्षी कार्यक्षेत्रातच क्षमतेपेक्षा जास्त नोंद झाली आहे. यामुळे कारखान्यांनी गेटकेनच्या उसाला बंदी न घातल्यास अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निश्चित निर्माण होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीतील बौद्ध धम्म परिषदेची तयारी पूर्ण

Spread the love  सुधाकर माने यांची माहिती; दोन सत्रात होणार कार्यक्रम निपाणी (वार्ता) : निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *