Thursday , September 19 2024
Breaking News

उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत शिवसेनेची युती?

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेसशी युती करण्याचे संकेत मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस शिवसेना युतीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले.
राऊत यांनी मात्र राज्यातील राजकारणासंदर्भात चर्चा झाली उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भातही चर्चा झाली. उध्दवजींशी चर्चा करून त्याची माहिती देण्यात येईल, असे स्पष्ट केले. प्रियंका गांधी यांच्याशी उद्या चर्चा होणार असल्याचे सांगत या संभाव्य युतीच्या चर्चेला हवा देण्याचे काम मात्र त्यांनी केले.
रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर भाजपाने धार्मिक ध्रुवीकरण केलेल्या उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे अनुमान आहे.
पत्रकारांना संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या आघाडीच्या चर्चा मीडियात आहेत. आमच्यात काही अशी चर्चा झाली नाही. आम्ही मीडियातूनच या चर्चा वाचत आहोत. आज मी राहुल गांधींना भेटत आहे. त्याला तुम्ही ’कर्टसी व्हिजीट’ म्हणू शकता. आम्ही संवाद साधतो. काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवत आहोत. तिन्ही पक्षाशी संवाद असावा वाटतो. त्यामुळे दिल्लीत असल्यावर एकमेकांना भेटून चर्चा करतो.
पाच राज्यात निवडणुका आहेत. आम्ही गोव्यात लढत आहोत. उत्तर प्रदेशात चाचपणी सुरू आहे. काँग्रेसही यूपीत लढत आहे. त्यामुळे राहुल गांधींशी उत्तर प्रदेशात लढण्याबाबत चर्चा झाली तर चर्चा केली, तसेच विरोधी पक्षाच्या ऐक्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
शिवसेना गोव्यात स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना तृणमूलच्या आघाडीत नाही. आम्हाला त्यांच्या आघाडीत जायचे नाही. गोवा आम्हाला जवळचा आहे. आम्ही अनेकदा निवडणुका लढवतोच. कार्यकर्त्यांची इच्छा असते निवडणुका लढवण्याची. आम्ही मागची निवडणूक युतीत लढलो. पण आम्हाला यश मिळाले नाही. आमचे काम सुरू आहे. पण योग्यवेळी निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
यूपीएचा भाग बनायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. कोणाचा भाग बनल्याशिवायही आम्ही तीन पक्ष विकास आघाडी म्हणून सत्तेत आहोत. यूपीएत काय असतं? भिन्न विचाराचे पक्ष एकत्र येतात. किमान समान कार्यक्रमावर सत्ता स्थापन करतात. एनडीएही त्याच पद्धतीने चाललं.
वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीएत विभिन्न विचाराचे पक्ष होते. राम मंदिराला विरोध करणारे पक्षही होते. यूपीएतही असे पक्ष होते. महाराष्ट्र विकास आघाडीतही भिन्न विचाराचे पक्ष आहेत. महाराष्ट्रात मिनी यूपीएचा प्रयोगच सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
कुणालाही चिंता करायची गरज नाही
महाराष्ट्रात आणि संसदेतही एकत्र आहोत, असंही ते म्हणाले. प्रियंका गांधींसोबत उद्याच्या भेटीचं शेड्यूल आहे. पण त्या अजूनही उत्तर प्रदेशात आहेत. त्यांनाही भेटू, असेही त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *