पणजी : गोव्यात काँग्रेसला आणखी एक दणका बसला आहे. या पक्षाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे गोव्यातील काँग्रेस आमदारांची संख्या आता केवळ तीन वर आली आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात लुईझिन्हो फालेरिओ यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेसचा रस्ता धरला होता. अर्थात रवि नाईक यांनी मागच्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण तांत्रिकदृष्ट्या ते काँग्रेसचे सदस्य होते.
आपण आपला पुढील राजकीय निर्णय लवकरच जाहीर करू असे त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितले. ते गोव्याच्या फोंडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. सन 2017 साली झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता.
Belgaum Varta Belgaum Varta