बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मंगळवारी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावला आले आहेत. किणये गावाजवळील रिजेंटा हॉटेलमध्ये भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्या मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंदीगवाड येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून रोखण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देता आले नाही, यामुळे संतप्त झालेल्या त्या शेतकऱ्याने आक्रोश व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी त्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसाने आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या मुख्यमंत्र्यांच्या कानी घालण्यासाठी आम्ही आलो असताना आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला. याचे आम्हाला दुःख असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. दरम्यान काही वेळाने त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना भेट घालून देण्यात आली.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …