चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले.
चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ दाखवून पैसे मागण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन ऐवान डिसोझा यांनी केले.
चिक्कोडी जिल्हा काँग्रेस निवडणूक आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात गेल्या आठ दिवसांपासून या परिसरातील आठ विधानसभा मतदारसंघांचा दौरा ऐवान डिसोझा यांनी केला. यादरम्यान मतदारांना भेटून त्यांचे मत जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या एकमताने चन्नराज हट्टीहोळी यांना प्रथम पसंतीचे मत देऊन निवडून आणण्याचा निर्धार केल्याचे ते म्हणाले.
राज्यात 15 जागांवर काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास देखील ऐवान डिसोझा यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, सत्तेत आल्यापासून भाजप जनतेला खोटी आश्वासने देत आहे. जनता भाजपला कंटाळली आहे. विधान परिषद निवडणुकीचे निकाल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचे ठरतील. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण, नरेगा, पंचायत राज व्यवस्थेत काँग्रेसचे योगदान मोठे आहे. याचा विचार करता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस अधिकाधिक जागा जिंकेल असा विश्वास ऐवान डिसोझा यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार गणेश हुक्केरी, प्रभाकर कोरे, अनिल सुणधोळी, महेश हट्टीहोळी, साभिर जमादार, अनिल पाटील, एच. एस. नसलापुरे, प्रदीप पाटील, गुलाब बागवान आदी उपस्थित होते.
Check Also
राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्काराचा उद्या वितरण समारंभ
Spread the love बेळगाव : थोर समाजसुधारक राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक …