बेळगाव : बाग परिवार यांच्यावतीने नुकताच काव्य वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्पलेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. आनंद कानविंदे आणि निपाणीचे प्रसिद्ध कवी किरण मेस्त्री उपस्थित होते.
प्रारंभी दल प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
भारती गावडे यांनी स्वागत गीत सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कवी मधू पाटील यांनी पोशिंदा ही कविता सादर करुन शेतकर्यांची व्यथा मांडली.
त्यानंतर अपर्णा पाटील यांनी मोक्ष, मेघा भंडारी यांनी खांदा, आरती पाटील यांनी आजची रखुमाई, धनश्री मुंचडी यांनी कलंक, स्मिता किल्लेकर यांनी आक्रोश, पल्लवी चव्हाण यांनी स्वप्न, चंद्रशेखर गायकवाड यांनी कष्ट, मनिषा नाडगौडा यांनी विर बिपिनजी, स्मिता पाटील यांनी धनी माझा, सेजल भोसले यांनी नाळ, भरत गावडे यांनी नवरा बिच्चारा, सरोज जाधव यांनी स्त्री जन्मा, सर्वेश सुतार यांनी सोबती, अशोक सुतार यांनी विचार दर्पण, अश्वजीत चौधरी यांनी शंभुराजे तुम्ही महाराष्ट्र जिवंत केला, आर. के. ठाकुर देसाई यांनी बस प्रवास, रोशनी हुंदरे यांनी रावण आणि निकीता भडकुंबे यांनी स्वप्न अशा एकापेक्षा विविध विषयांवरील कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी सुनील मेणसे, मुक्ता पाटील, ऐश्वर्या देसाई, दिलीप सावंत, अर्जून सांगावकर, निलेश खराडे, अस्मिता देशपांडे, सरोज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप मुतगेकर यांनी आभार मानले.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …