मंत्री आर. अशोक यांची माहिती
बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात मराठा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास महामंडळ घोषणा केली आहे. दरम्यान अद्यापही या महामंडळावर अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड झालेली नाही. यासंदर्भात आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी आज गुरुवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना मंत्री आर. अशोक यांनी राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या प्रगती संदर्भात मंत्रमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. लवकरात लवकर या महामंडळावर अध्यक्ष तसेच पदाधिकार्यांची निवड जाहीर केली जाईल.
सध्या या महामंडळासाठी 50 कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या अनुदानातही वाढ करण्यात येईल असे आश्वासन मंत्री आर. अशोक यांनी दिले आहेत. आमदार बसवराज पाटील पुढे बोलताना म्हणाले, देशात हिंदू समाजाच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान प्रेरणादायी आहे. कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची मागणी सातत्याने केली जात आहे. विकास महामंडळ जाहीर करण्यात आले आहे. मात्र आश्वासनापलीकडे काहीच झालेले नाही. याचा विचार केल्यास कर्नाटकातील मराठा समाजाकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचा गंभीर विचार करून सरकारने राज्यातील मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे. विकास महामंडळावर पदाधिकार्यांची तात्काळ नियुक्ती करावी. तसेच विकास महामंडळाला शंभर कोटी रुपये अनुदान त्वरित जाहीर करावे अशी मागणी बसवराज पाटील यत्नाळ यांनी केली. त्यांच्या या मागणीला आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके यांनी पाठिंबा दर्शवला.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …