Monday , December 23 2024
Breaking News

आज-उद्या शहराला पाणी पुरवठा नाही!

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या 10-15 दिवसापासून पाणी टंचाईची समस्या तीव्र झालेली असतानाच आता आज आणि उद्या गुरुवारी शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
शहराच्या हिंडलगा पंपिंग हाऊस येथील दोन स्टार्टर पॅनल जळाल्यामुळे आज आणि उद्या गुरुवार दि. 17 फेब्रुवारी रोजी शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठ्याची सोय केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. केयुआयडीएफसीच्या व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीने सदर पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले असून नागरिकांनी पाणी पुरवठ्यातील व्यत्ययाची नोंद घेऊन एल अँड टी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरवासीयांना 25 तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविण्यात येत असली तरी सध्या गेल्या 10-15 दिवसांपासून शहर उपनगराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने शहरवासीयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहराच्या सर्वच भागात गेल्या कांही दिवसापासून पाणी नसल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. काही भागात पाच दिवसांतून एकदा होणारा पाणी पुरवठा फक्त एकच तास होत आहे. हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यास एल अँड टी कंपनी अपयशी ठरली असून शहरवासीयांना त्याचा फटका बसत आहे. पाण्यासाठी वेळ वाया जात असून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *