Wednesday , June 19 2024
Breaking News

कणगलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात; युवक- युवती ठार

Spread the love

संकेश्वर : कणगला सर्कलजवळ राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू बोलेरो आणि कारच्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून एक जण जखमी झाला.
पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तिघे मित्र तवंदी येथील हॉटेलमध्ये जेवण करून संकेश्वरकडे परतत असताना निपाणीहून कणगलाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहू बोलेरोने स्वीफ्ट कारला डाव्या बाजूने जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातामध्ये कार चालक प्रशांत कलप्पा कोलारगी (वय 24, राहणार कमतनूर तालुका हुक्केरी) आणि त्याची मैत्रिण श्रध्दा तेलसंगमठ (राहणार अथणी) जागीच ठार झाले.
कारमध्ये सीटबेल्ट लावून बसलेला मित्र नागराज मोहन चौगुला अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी नागराजला उपचार्थ इस्पितळात दाखल केले. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मालवाहू बोलेरो चालक फरार झाल्याने पोलिस शोध घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

खासदार जगदीश शेट्टर यांची संपादकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा व प्रादेशिक वृत्तपत्र संपादक संघाच्या शिष्टमंडळाने आज बेळगावचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *