युवा नेते उत्तम पाटील : बोरगांवमध्ये घरपोच उतारे उपक्रमास प्रारंभ
निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागासह वाडी-वस्तीवरील नागरिक व शेतकऱ्यांना घरपोच उतारे मिळावेत, यासाठी राज्य सरकार महसूल खात्याकडून महसूल दाखले घरोघरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जागृती करून या उपक्रमाचा लाभ मिळावा,यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. घरपोच उतारे या उपक्रम शेतकऱ्यासाठी स्तुत्य असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहान युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. बोरगाव येथे महसूल दाखले घरोघरी या योजनेचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, जिल्हा व तालुका वारी थांबण्यासाठी व सर्वांना सोयीस्कर होण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेती उतारे, नकाशे, जात, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध दाखले शेतकऱ्यांना घरपोच व्हावेत, यासाठी हा उपक्रम आहे. निपाणी तालुक्यातील ४३ गावात त्याची सोय करण्यात आली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून हा उपक्रम यशस्वी करण्या साठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
ग्राम तलाठी मल्लिकार्जुन यांनी, शेतकऱ्यांसह वृद्धांना घरपोच पेन्शन, प्रमाणपत्र उतारे, जाती, प्रमाणपत्र उत्पन्न दाखला प्रमाणपत्र घरपोच मिळणार आहेत. यासाठी महसूल खात्याकडून नूतन उपक्रम राबविण्यात येत आहे. बोरगाव येथे पहिल्या टप्प्यात सहाशेहून अधिक नागरिकांना उतारे देण्यात येत असून सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास नगरसेवक अभयकुमार मगदूम, प्रदीप माळी, भारती वसवाडे, वर्षा मनगुते, शोभा हावले, तुळशीदास वसवाडे, संगीता शिंगे, सुवर्णा सोबाने, अश्विनी पवार, गिरीजा वठारे, अमर शिंगे, भरत कांबळे, चंदू पाटील, रुकसाना अफराज, भैय्या अफराज, दिगंबर कांबळे, पिंटू कांबळे, जावेद मकानदार, माणिक कुंभार, राजू मगदूम, अभयकुमार कारोले, अशोक माळी, जयपाल पाटील, विलास माळी, दिलीप गोसावी यांच्यासह नगरपंचायत सदस्य, महसूल खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.