Sunday , July 26 2026
Breaking News

विद्यार्थ्यांनी खेळ आणि अभ्यासामध्ये समतोल राखावा

Spread the love
 डॉ. एम. बी. शेख : कुर्ली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेसाठी प्रचंड ऊर्जा असते. विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळ याचा समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनू शकते. स्पर्धेमुळे संघभावना व खिलाडीवृत्ती वाढते, असे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य डॉ.एम. बी. शेख यांनी व्यक्त केले. कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी  अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी क्रिडा शिक्षणाधिकारी एस. बी. जोगळे होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एस. डुबल यांनी शाहू कॉलेजच्या माध्यमातून चालवलेल्या उपक्रमांची माहिती देऊन सैन्य, पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शालेय जीवनातच सुरुवात केल्यास नक्की यश मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
निपाणी तालुका क्रिडा शिक्षणाधिकारी एस. बी. जोगळे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विज्ञान व क्रीडा नैपुण्याचे भरभरुन कौतूक केले. विद्यार्थ्यांना खेळभावना जोपासण्याचे आवाहन करीत प्रबोधनपर गोष्टीही सांगितल्या. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. प्रणव पोवार व सरिता पाटील यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास स्कूल कमिटीचे  सदस्या सीमा पाटील, अरुण निकाडे, तानाजी पाटील, के. डी. पाटील, टी. पी. कांबळे यांच्यासह,विद्यालयाचा सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *