Saturday , July 27 2024
Breaking News

काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष पक्षानी एकत्र येण्याची गरज

Spread the love

 


माजी पंतप्रधान देवेगौडा, मोदींच्या क्रीयाशीलतेचाही गौरव

बंगळूर : काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष प्रादेशिक पक्ष देशाच्या हितासाठी एकत्र आले तर चांगले होईल, असे मत धजदचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. गुजरात दौऱ्याकडे लक्ष वेधून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात पक्षाचा विस्तार करण्याच्या वचनबद्धतेबद्दल प्रशंसा केली आणि अपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्येही अशाच गुणवत्तेची अपेक्षा केली.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत माझा पक्ष कसा वाचवायचा आणि वाढवायचा हा एकच अजेंडा माझ्यासमोर आहे. आज काँग्रेसची स्थिती काय आहे? कॉंग्रेसची स्थिती आता प्रादेशिक पक्षासारखी ठराविक जागांपुरती मर्यादित आहे. सर्व धर्मनिरपेक्ष प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले तर बरे होईल. काँग्रेससह देशाच्या हितासाठी एकत्र या, असे माजी पंतप्रधानांनी येथे पत्रकारांना सांगितले.
त्यावर निर्णय घेणे पक्षांच्या नेत्यांवर अवलंबून आहे, असे नमूद करून, त्यांनी सांगितले की, आपले पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीवेळी विविध राज्यांचे सहा मुख्यमंत्री आणि १५ राजकीय नेत्यांना एका मंचावर एकत्र करून २०१८ मध्ये हा प्रयत्न केला, परंतु अयशस्वी झाला. आता दुसऱ्यांदा प्रयत्न करण्याचा विचार करणार नाही, असे ते म्हणाले.
पाच राज्यांतील निवडणूक निकालांवर बोलताना धजदचे सर्वेसर्वा देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाची देशभरात उपस्थिती वाढवण्याच्या कटिबद्धतेची प्रशंसा केली. पाचपैकी चार राज्यांमध्ये विजय हा त्यांचा (मोदी) आहे. निकालानंतर लगेचच ते गुजरातला गेले आणि दोन दिवस तिथे तळ ठोकला. देशाच्या सर्व भागात पक्षाचा विस्तार करण्याची त्यांची तळमळ आणि वचनबद्धता आहे. मी ते टीव्हीवर पाहिले, त्यानी अनेक बैठका आणि कार्यक्रमांची मालिका तयार केली आहे. आपल्याही अशाच भावना असायला हव्यात, असे ते म्हणाले.
आपण किंवा कुमारस्वामी एकटे काही साध्य करू शकत नाही, असे निरीक्षण करून गौडा म्हणाले की, धजदच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे. राज्यात या पक्षाला वाचवणे हेच माझे एकमेव उद्दिष्ट आहे. या संदर्भात मी २० मार्च रोजी रणनीती तयार करण्यासाठी बंगळुर येथील राजवाड्याच्या मैदानावर पक्षनिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण दर महिन्याला दोन जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गौडा असेही म्हणाले की, अंतर्गत समस्या सोडविण्यास काँग्रेसची असमर्थता आणि सर्वांना सोबत घेऊन नगेल्याने पंजाबमध्ये त्यांची कामगिरी खराब झाली. त्याचा फायदा आम आदमी पक्षाला झाला. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणतीही युती नाकारत, एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, त्यांचा पक्ष दोन्ही राष्ट्रीय पक्षांविरुद्ध लढेल.
एकेकाळी या पक्षाने देशावर राज्य केले होते. मत्सर, अधीरता आणि इतर अनेक कारणांमुळे त्याची सद्यस्थिती निर्माण झाली, एक कन्नडिग पंतप्रधान झाला हे आतील लोकांना सहन होत नव्हते. मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, पण सत्तेत असताना आम्ही केलेली कामे घेऊन मी लोकांपर्यंत जाईन, असे ते म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना गौडा म्हणाले की, कर्नाटकचे राजकारण इतरांपेक्षा वेगळे असल्याने राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे नेणे सोपे नाही.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

Spread the love  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *