Tuesday , September 17 2024
Breaking News

उन्हाळ्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली!

Spread the love
किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये नग : दरात दुप्पटीन वाढ
निपाणी (वार्ता) : उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते, तसेच गारवा मिळतो. उन्हाच्या तडाख्यापासून काही वेळासाठी सुटका होते. लाल बुंद असणाऱ्या टरबुजाचे निपाणी बाजारात यंदादर  वाढले असून ६० ते ७० रुपये नग प्रमाणे बाजारात उपलब्ध आहेत. कलिंगडमध्ये सुमारे ९० टक्के पाणी असते, जे आपल्याला हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. कलिंगड खाण्यासाठी देखील चवदार असते. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. यात जीवनसत्वे, खनिजे आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आहेत. कलिंगडमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यात मिनसी आणि व्हिटॅमिन ए असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
 उन्हाची तीव्रता असल्याने ‘शुगरक्वीन’ जातीच्या कलिंगडांना सर्वाधिक मागणी आहे. अक्कोळ रोडवरील फळ मार्केटमध्ये कलिंगडाची रोज ५ ते ८ टन आवक होत आहे. ज्यूस सेंटर चालकांकडून उन्हाळ्यात कलिंगडांना मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार एक कलिंगड ६० ते ७० रुपयांपर्यंत मिळत आहेत. बाजारात निपाणी भागासह जिल्ह्यातील विविध भागातून कलिंगडाची आवक होत आहे. . उन्हाळा वाढेल तसे ग्राहकांची संख्याही वाढत आहे. फ्रूट सॅलाड आणि ज्यूस बनवण्यासाठी कलिंगडाला मागणी आहे.
—-
कलिंगडाचे प्रकार
* गडद हिरव्या रंगाचे कलिंगड ‘शुगरकिंग’ या नावाने ओळखले जाते. नावाप्रमाणे त्यांची चवही साखरेसारखी असते
* फिक्कट हिरवे पट्टे असणारी लांबट आणि आकाराने मोठे असणारे कलिंगड ‘नामधारी’ या नावाने ओळखले जातात.
कलिंगड खाण्याचे फायदे
*रक्तदाब नियंत्रित करून आपले शरीर हायड्रेटेड ठेवते.
*शरीराला उष्णतेपासून वाचविण्यात मदत करते. *कलिंगडमुळे वेगाने वजन कमी होते.
*कलिंगडमधील पोषक घटक हृदय निरोगी ठेवून पचन सुधारते.
*किडनी स्टोनच्या त्रासातून मुक्तता मिळते.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *