बेळगाव : श्रीक्षेत्र धर्मस्थळाचे धर्माचार्य श्री. डॉ. वीरेंद्र हेगडे, आई श्री हेमावती व्ही. हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगांव तालुक्यातील सुमारे 85 गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच अन्न धान्य किटचे वितरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येळ्ळूर येथील काही गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच अन्न धान्य किटचे वितरण करण्यात आले.
याशिवाय गरीब बेड रेस्ट रुग्णांना पाण्याच्या गादीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला बेळगांव जिल्हा जनजागृती सदस्य दुदाप्पा बागेवाडी, कुक्कुटपालन सेवा प्रतिनिधी ज्योती डोण्याण्णावर, कुक्कुटपालन सेवा प्रतिनिधी श्रीमती सुरेखा आणि सुनीता, गंगा पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रा.पं. सदस्या रुपा पुण्याणावर यासह संघाच्या सदस्या उपस्थित होत्या.