Friday , November 6 2026
Breaking News

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल

Spread the love

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज बुधवारी सत्यजित कदम यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपकडून दसरा चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर निशाणा साधला. सत्यजित उर्फ नाना कदम यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जाताना प्रचंड मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यावरुन स्पष्ट होतं की, भाजप या पोटनिवडणुकीत विजयी होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

About Belgaum Varta

Check Also

महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील कामे तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *