खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभळणारे तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी पद गेल्या काही महिण्यापासून रिक्तच आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयाबरोबरच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयातील कामकाज तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कामकाज ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची गैर सोय होय.
खानापूर तालुका हा मागासलेला, तसेच जंगलाने वेढलेला तालुका आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक समस्या समोर येत आहेत. असे असताना तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यभार अधिकारी म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तेच तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक अधिकारी अद्याप हजर नाहीत. त्यामुळे विकास कामाना खिळ बसली आहे.
तालुका पंचायत कार्यालयात अनेक ग्राम पंचायत अध्यक्ष सदस्य आपल्या समस्या घेऊन जातात. मात्र तालुका पंचायत कार्यालयातील कार्यनिर्वाहक अधिकारीच खुर्चीवर नसल्याने नागरिकांना परत पावली यावे लागत आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …