खानापूर (प्रतिनिधी) : एकीकडे खानापूरचा विकास झाला असे लोकप्रतिनिधी सांगत असताना खानापूर शहरातील अनेक भागातील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्यामुळे नागरिकांकाना मृत्यचे आमंत्रण होत आहे.
याचे उदाहरण म्हणजे खानापूर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडवरील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्या होय.
खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोड हा नेहमीच माणसानी गजबजला रस्ता आहे. अशा रस्त्यावरील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्या नागरिकांना मृत्यचे आमंत्रण आहे. दरवाजे नसल्याने शहरातील अनेक फ्यूजपेट्या धोकादायक बनल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित हेस्काॅम खात्याचे दुर्लक्ष असुन शहरातील विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्याना दरवाजे कधी बसवणार व भविष्यात होणारा धोका कधी दुर करणार का? असा सवाल खानापूर शहरवासीतून करण्यात येत आहे..
रेल्वेस्टेशन रोडवर सकाळी माॅर्निग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका संभवतो. शहरात काही ठिकाणी फ्यूजपेट्या जमिनीपासून जवळ आहेत. अशा ठिकाणी वाहनाची नेहमीच वर्दळ असते. वेळ-काळ काही सांगुन येत नाही तेव्हा चुकून जरी कोणी उघड्या फ्यूजपेट्याच्या सहवासात आला तर मोठी दुर्घटना होण्याचा संभव असतो
तर कुत्र्यासह पाळीव जनावरांचा वावर असतो. त्यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका संभवतो आहे.
तेव्हा खानापूर नगरपंचायतीने तसेच हेस्काॅम खात्याच्या कार्यकारी अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन खानापूर शहरासह उपनगरात विद्युत खांबावरील उघड्या फ्यूजपेट्याना दरवाजे बसवून नागरिकांच्या जीवाला धोका पोहचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
अन्यथा खानापूर शहरवासीयाना रस्त्यावर येण्याची वेळ येईल.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …