Monday , December 23 2024
Breaking News

गणेबैल टोलनाका अद्याप प्रतिक्षेत!

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण युध्दपातळीवर सुरू आहे. या चौपदीकरणाबरोबर आता टोलनाका कामाला सुरूवात होऊन वर्ष ओलांडले. तरी अद्याप गणेबैल टोल नाका पूर्णत्वाकडे गेला नाही. त्यामुळे गणेबैल टोलनाका आज प्रतिक्षेत आहे.
बेळगाव ते खानापूर दरम्यान खानापूर तालुक्यात गणेबैल येथे टोल नाका उभारण्यात आला. त्यामुळे भविष्यात या भागातील गणेबैलसह इदलहोंड, सिंगीनकोप, झाडअंकले, माळअंकले, निट्टूर, प्रभूनगर, खेमेवाडी, काटगाळी आदी गावच्या स्थानिक नागरिकांच्या वाहनांना दररोज या मार्गावरून ये-जा करावी लागणार. त्यामुळे टोलनाक्याचा भुर्दंड स्थानिक वाहनधारकांना पडणार का? याची भिती आतापासूनच भेडसावीत आहे.
तेव्हा या भागातील स्थानिक वाहनांना टोलमधून सुट द्यावी अथवा मोफत पासाचे वितरण करावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
या पणजी-बेळगाव महामार्गावर टोल आकारणीचे स्वरूप आणि दर अद्याप निश्चित केले नसले तरी टोलनाक्याच्या उभारणीनंतर खानापूर-बेळगाव महामार्गावरील प्रवास महागणार हे मात्र निश्चित आहे.
अद्याप टोलची रक्कम निश्चित करण्यात आली नाही. तथापि गणेबैल परिसरातील अनेक गावचे नागरिक, शेतकरी, कामगार दररोज याच महामार्गावरून ये-जा करणार तेव्हा स्थानिकांना या रोजच्या टोलमधून सुट द्यावी. अन्यथा गणेबैल टोलनाका म्हणजे स्थानिक वाहनधारकांना भुर्दंड होईल. याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी याभागातील जनतेतून होत आहे.
गणेबैल टोलनाक्यावर मराठी फलक बसवा. तरच टोल भरू अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठी फलक बसत नाहीत तोपर्यंत टोल भरण्यास साफ विरोध राहिल, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!

Spread the love  खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *