मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आयोगानं पाठवलेलं हे तिसरं समन्स आहे. यापूर्वी दोन वेळेस वैयक्तिक करणांमुळं पवार या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते.
येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईमध्ये भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीला शरद पवारांना हजर राहण्याचे निर्देश आयोगानं समन्सद्वारे दिले आहेत. याआधीच्या सुनावणीवेळी पवार हजर राहू शकले नव्हते. गेल्यावेळी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा सुनावणी होणार होती तेव्हा पवारांनी आयोगाकडे वेळ मागू घेत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. यासाठी आयोगानं त्यांना परवानगी दिली होती. हे प्रतिज्ञापत्र पवारांच्यावतीनं नुकतचं आयोगापुढे सादर करण्यात आलं आहे. त्यानुसार आयोगानं येत्या काळात होणाऱ्या सुनावणीसाठी पुन्हा एकदा शरद पवारांना समन्स बजावलं आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव इथं दंगल झाली होती. या ठिकाणी असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर समाजकंटकांनी हल्ला केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून निवृत्त न्यायाधीश जयंत पटेल यांच्या एकसदस्यीय आयोगाची नेमणूक करण्यात आली होती.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …