Monday , September 21 2026
Breaking News

गोवा बनावटीचा 14 लाखाहून अधिक रुपयांचा मद्यसाठा जप्त

Spread the love

 

कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस. एम. मस्करे यांनी दिली आहे.

कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर- नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 ला राधानगरी – कोल्हापूर रोडवरुन एका चारचाकी सिल्व्हर कलरच्या जेनिओ वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली असता दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची जेनिओ रजि.क्र. MH-07-P-4755 येत असलेली दिसली. या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले कागदी पुठ्याचे विविध बँडचे 180, 500 तसेच 750 मिलीचे एकुण 151 बॉक्स आढळून आले.

या प्रकरणी प्रसाद महादेव नराम व.व.51, रा. घर नं-११८४, मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदर्ग-४१६६०१ या आरोपीस अटक केली असून पकडण्यात आलेल्या जेनिओ मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य व बिअर चा मद्यसाठा आढळून आला आहे. वाहनासह मद्याची एकूण किंमत 14 लाख 28 हजार 600 रुपयांची असून निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये इतकी आहे. या गुन्ह्यामध्ये सापडलेल्या आरोपी व्यतिरीक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का? तसेच या मद्याचा कोठे पुरवठा करणार होता? याबाबतचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर व जवान विलास पवार, विशाल भोई, सचिन लोंढे, धीरज पांढरे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे हे करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *