माणगांव (नरेश पाटील) : माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे हे मागील 10 दिवसांपासून कार्यालयात कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता गायब असल्याकारणाने माणगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल इंगळे हे बेपत्ता असल्याचे सांगितले आणि तशी रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, गटनेते नगरसेवक प्रशांत साबळे, स्वच्छता सभापती अजित तारलेकर, नगरसेवक कपिल गायकवाड, महिला बालकल्याण सभापती शर्मिला सुर्वे, नगरसेवक दिनेश रातवडकर, स्वीकृत नगरसेवक हेमंत शेठ आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी राहुल इंगळे हे गेले दहा दिवस बेपत्ता असल्याचे नगराध्यक्ष पवार यांनी सांगितले. याच बरोबर माणगांव नगरपंचायतीचे बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाचे इंजिनीअर आकाश बुवा हे देखील सोमवारपासून चार दिवस बेपत्ता आहेत. याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. याकरिता काळजीपोटी नगराध्यक्षानी पोलिसात तसेच प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
मागील काही दिवसांपासून राहुल इंगळे यांचा मनमानी कारभार सुरू होता. कार्यालयात कधीही येणे, कधीही जाणे असा प्रकार चालू होता. त्याचबरोबर अभियंता आकाश बुवा हे देखील अलिबागला आहे असे सांगून कोणाचेही फोन उचलत नाहीत. मागील पाच वर्षात कामे न करता बिले काढण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत त्याबद्दल विचारणा केलेल्या दिवसापासून माणगांवचे सीईओ बेपत्ता असल्याचे नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोणत्याही प्रकारचा राजेचा अर्ज नाही की कोणत्याही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कोणतीच कल्पना नाही आणि दोन्ही जबाबदार अधिकारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे मागील पाच वर्षात सत्ताधारी आणि अधिकारी यांचे काही साटेलोटे होते की काय असा आरोप नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दोन जबाबदार अधिकारी अचानक बेपत्ता झाल्यामुळे माणगांवमध्ये उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
माणगांव नागरपंचायत हद्दीतील घनकचरा संकलन करणे व वाहतूक करणे, नागरपंचायत हद्दीतील नाले, गटारी यांची सफाई करणे, नगरपंचायतींकरिता 13 पिट कंपोस्टिंग व एमआरएफ घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया, केंद्र बांधकाम करणे अश्या सुमारे कोट्यवधी रुपयांच्या कामामध्ये नगरपंचायतीचे पाणीपुरवठा व आरोग्य अभियंता आकाश बुवा यांनी पर्यवेक्षण करून दिलेल्या देयकांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्याने 20 एप्रिल पासून बुवा यांनी कोणाचेही फोन घेतलेले नाहीत त्यांची पर्यवेक्षकद्वारे वरील देयकांची चौकशीचे आदेश देण्यात यावेत अश्या आशयाचे पत्र नगरसेवक कपिल गायकवाड यांनी 26 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यधिकाऱ्यांना दिली आहे.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …