Saturday , October 19 2024
Breaking News

सेवानिवृत्तीनिमित्त मारुती नारायण दळवी यांचा सत्कार!

Spread the love

खानापूर : ब्रँच पोस्टमास्तर मणतुर्गा मारुती नारायण दळवी यांचा मुदतपूर्व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ खानापूर पोस्ट ऑफिस येथे संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य डाकघर खानापूर पोस्टमास्तर
विरभद्रप्पा बेंचनमर्डी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साऊथ सब डिव्हिजन बेळगाव श्री. बी. पी. माळगी, माजी तालुका पंचायत सदस्य मणतुर्गा बाळासाहेब महादेवराव शेलार, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. आबासाहेब नारायणराव दळवी, खानापूर अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन श्री. अमृत महादेवराव शेलार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पोस्टमन सुरप्पा पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रँच पोस्टमास्तर शिरोली श्री. श्रीपाद कृष्णा शिवोलकर यांनी केले.
यावेळी बाळासाहेब शेलार, आबासाहेब दळवी, रणजीत पाटील, मणतुर्गा येथील
प्राथमिक शिक्षक श्री. मष्णू चोर्लेकर, कारलगा
ब्रँच पोस्टमास्तर शंकर पाटील, पोस्ट कर्मचारी बेळगांव श्री. भिकाजी महाजीक, पोस्टमन मणतुर्गा श्री. सुरप्पा पाटील, बेंचनमर्डी पोस्टमास्तर बी. पी. माळगी तसेच सत्कारमूर्ती मारुती दळवी यांची भाषणे झाली.
आबासाहेब दळवी यांनी आपल्या भाषणातून सत्कारमूर्ती मारुती दळवी यांचा जीवनप्रवास उलगडविला तर अध्यक्षीय भाषणात विरभद्रप्पा बेंचनमर्डी यांनी मारुती दळवी यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यावेळी ते म्हणाले की, मारुती दळवी हे एक कर्तव्यदक्ष ब्रँच पोस्टमास्तर आहेत. त्यांनी ग्रामीण भागात पोस्ट सेवा बजावत असताना अनेक समस्यांना तोंड देत आपले काम इमानदारीने केले आहे. तसेच पोस्ट खात्याच्या विविध योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोचविल्या आहेत. त्यांचा आदर्श तालुक्यातील इतर ग्रामीण पोस्टमास्तरांनी घ्यावा आणि योजना यशस्वी कराव्यात, असे म्हणाले.
यावेळी शंकर पाटील, उदय देसाई, मिराशी, शिरील पिंटो, पी. आर. पाटील, शुभम देसाई, ब्रम्हानंद भुजगुरव, विठ्ठल गुरव, सुशील मेलगे, शिवाजी कांबळे, अदृश्यया नाईक, धनंजय गोळ्यालकर, प्रीती मॅडम,पाटील मॅडम, एन. के. पाटील, माणिकराव देसाई, जयसिंग देसाई, सदाशिव दळवी, हणमंत दळवी, सतीश पाटील, निवृत्त पोस्टमन मनोहारी देसाई, निवास दळवी, लक्ष्मण भाटवडकर, अनिल जाधव (व्हन्याळ), तसेच मणतूर्गा ग्रामस्थ दळवी कुटुंबीय उपस्थित हिते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोस्टमन शिरोली श्री. धर्माजी नंद्रणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पोस्टमास्तर कारलगा श्री. शंकर पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *