विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
निपाणी (वार्ता) : अमलझरी येथील मसोबा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास शर्यतींचे आयोजन केले होते. जनरल बैलगाडी शर्यतीत अमलझरी येथील नितीन पाटील, आडी येथील बल्लू हरेल, अमलझरी येथील साईराम खोत यांच्या बैलगाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना श्रीमंत दादाराजे देसाई सरकार यांच्या हस्ते बक्षीसे दिली.
जनरल घोडाबैल गाडी शर्यतीत अमलझरी येथील नितीन पाटील, बाळू कौंदाडे, घोडागाडी शर्यतीत साईनाथ खोत-अमलझरी, सचिन काटकर-निपाणी, कुणाल पाटील-अमलझरी, घोडेस्वार शर्यतीत पृथ्वीराज पाटील-पट्टणकुडी, विजय नाईक-वाळकी यांनी बक्षीसे मिळविली. विजेत्यांना बळीराम खोत, शिवाजी खोत, कृष्णात बाडकर, दादासाहेब पाटील, सिद्राम पुजारी, अभिजीत कौंदाडे, किरण पाटील, चंद्रकांत खोत, सचिन कौंदाडे, मलगोंडा रेपे, सुरेश इंगळे, रामा लुगडे, राजेंद्र खोत, अरुण खराडे, दीपक चौगुले व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे दिली.
यात्रेनिमित्त श्रीमंत दादाराजे देसाई यांच्या हस्ते पालखी पूजन व आरती झाली. त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक झाली. पहाटे दंडवत व दुपारी महाप्रसाद वाटप झाला.