Saturday , October 19 2024
Breaking News

संकेश्वरात जय भवानी जय शिवाजीच्या गजरात सात तास मिरवणूक

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात तब्बल दोन वर्षानंतर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात, डाॅल्बीच्या दणदणाटात अभूतपूर्व उत्साही वातावरणात गावातील प्रमुख मार्गे शिवजयंती मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत डाॅल्बीच्या दणदणाटात शिवगितांच्या तालावर युवक नृत्यांत रममाण होऊन गेलेले दिसले. मिरवणुकीत भगवे ध्वज, शिवरायांचा जयजयकार आणि डाॅल्बीच्या आकर्षक दिव्यांचा झगमगाट लक्षवेधी ठरलेला दिसला. सजविलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलितील शिवपुतळ्याला सर्व समाजातील शिवभक्तांनी मानाचा मुजरा करून शिवरायांचा आशीर्वाद घेतला. संकेश्वर मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती मिरवणुकीला युवानेते पवन कत्ती, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नंदू मुडशी, नगरसेवक अमर नलवडे, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ यांनी शिवप्रतिमेचे पूजन करुन चालना दिली. मिरवणुकीत उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, प्रमोद होसमनी, डॉ. मंदार हावळ, संकेश्वर मराठा समाज अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष अप्पा मोरे, उपाध्यक्ष सुभाष कासारकर, अभिजित कुरणकर, दिपक भिसे, जयप्रकाश सावंत, समीर पाटील, विकी मोरे, शाम यादव, नेताजी आगम, महादेव डावरे, राजेश गायकवाड, पुष्पराज माने, सचिन सपाटे, अविनाश नलवडे, नारायण कदम, सुधाकर ओतारी, दादासाहेब बेविनकट्टी शिवभक्त, शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवजयंती मिरवणुकीची सुरुवात नदी गल्ली येथून करण्यात आली. मिरवणूक नदी गल्ली, मठ गल्ली, गांधी चौक, नेहरु रोड, सुभाष रोड, संसुध्दी गल्ली, माळी गल्ली, मड्डी गल्ली, पोस्ट रोड, चन्नम्मा सर्कल ते शिवाजी चौक अशी काढण्यात आली. तब्बल सात तास चाललेल्या भव्य मिरवणुकीची सांगता शिवाजी चौकात करण्यात आली.

शिवजयंती मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संदिप बांबरे, जयू कदम, अक्षय खाडे, ओंकार माने, आकाश खाडे, संदिप लोखंडे, संतोष पाटील, ओंकार डावरे, प्रशांत कदम, गजू मोकाशी, सचिन मोकाशी, जयू खाडे, शिवप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *