Monday , September 14 2026
Breaking News

भाडे द्या अन्यथा जेसीबी लावून जमीनदोस्त करा : आमदार अनिल बेनके

Spread the love

बेळगाव : उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत्र नसल्यामुळे जुने भाजी मार्केट जेसीबी लावून जमीनदोस्त करा असा सल्ला कॅन्टोन्मेंट बोर्डाला आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला. कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासिक बैठक कॅम्प येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी शहरातील जुन्या भाजी मार्केटमधील धूळखात पडून असलेली दुकाने एक तर भाड्याने द्या अन्यथा जेसीबी लावून जमीनदोस्त करा असा परखड सल्ला दिला.
यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की जुने भाजी मार्केटमधील दुकाने धूळखात पडली आहेत. यातून एक रुपयही उत्पन्न येत नसल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला तोटा सहन करावा लागत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालिकेचे जुने भाजी मार्केट दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. तसेच या दुकानांचा वापर होत नसल्यामुळे या ठिकाणी आणि गैरकृत्ये घडत आहेत. या ठिकाणी अनैतिक व बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्यामुळे संबंधित रिकामी दुकाने टेंडर काढून भाड्याने देण्यात यावीत अथवा जेसीबी लावून जमीनदोस्त करावीत असा सल्ला बैठकीत कॅन्टोन्मेंटच्या अध्यक्षांना दिला.
याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी हे होते. याप्रसंगी बैठकीत विकास कामे, टॅक्स, जन्म मृत्यू दाखला, आर्थिक विवरण, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बजेट, वार्षिक प्रशासकीय अहवाल यासह कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती वेतन यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात डॉल्बी-डीजे-लेझरवर बंदी; पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन

Spread the love    आदर्श गणेश विसर्जन मिरवणुकीला पोलिसांकडून पुरस्कार बेळगाव : गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *