Monday , September 21 2026
Breaking News

विधान परिषदेच्या ७ जागांसाठी ३ जूनला मतदान

Spread the love

बेंगळुरू : विधान परिषदेच्या ७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ३ जून रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना १७ मे रोजी काढण्यात येणार आहे. २४ मे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेचे सदस्य भाजपचे लक्ष्मण सवदी, लेहर सिंग, काँग्रेसचे आर. व्ही तीम्मापुर, अल्लम वीरभद्रप्पा, वीणा अब्बय्या, तर जेडीएसचे रमेश गौड, नारायण स्वामी यांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे होणाऱ्या या निवडणुकीत भाजपचे ४, काँग्रेस व जेडीएसचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे २२५ सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. दरम्यान, लक्ष्मण सवदी पुन्हा एमएलसी होणार का अथणी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *