संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग 13 चा सर्वांगिण विकास साधण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे प्रचारात मतदारांचा वाढता पाठिंबा मिळाल्याचे भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते नगरसेवक रोहण नेसरी यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले प्रभाग 13 चे दिवंगत नगरसेवक, आमचे स्नेही संजय नष्टी यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करुन दाखविणार आहोत. प्रभागातील लोकांकडून समस्या जाणून घेतल्या आहेत. ते सोडविणे आपले आद्य कर्तव्य निश्चितच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना माजी नगराध्यक्ष गजानन क्वळी, कुरबर समाजाचे नेते शंकरराव हेगडे, सभापती सुनिल पर्वतराव म्हणाले, आमचे लाडके नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांनी संकेश्वरात अनेकविध विकास कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने 24ु7 शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा योजनेचा समावेश होतो. संकेश्वरात हायटेक बसस्टँड, पालिकेची नूतन इमारत, सबरजिस्ट्रार कार्यालय आणि संकेश्वर जुना पी. बी. रोड चौपदरीकरणाचे काम त्यांनी करुन दाखविले आहे. संकेश्वरात लवकरच युजीडी योजना कार्यान्वित होत असल्याने गावातील रस्ते डांबरीकरण, गटार निर्माणच्या कामाला ब्रेक देण्यात आला आहे. विरोधकांनी हताश भावनेतून नंदू मुडशी यांच्यावर कांहीबांही टिका चालविली आहे. प्रभागातील सूज्ञ मतदार त्याला भिक घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसवराज बागलकोटी, महेश देसाई, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, संदिप गंजी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिली. यावेळी बसवराज बस्तवाडी, किरण नेसरी, समत पट्टणशेट्टी, प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …