Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव रेल्वे स्थानकाला क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव द्यावे

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहर रेल्वे स्थानकाला क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव देण्यात यावे, रेल्वे स्थानकाबाहेर सिंधूर लक्ष्मण यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी बेळगावमधील कर्नाटक अनुसूचित जाती वाल्मिकी राज्य युवा घटक आणि अभिमानी संघाने केली आहे.
बुधवारी क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांच्या जयंतीनिमित्त बेळगावमधील कर्नाटक अनुसूचित जाती वाल्मिकी राज्य युवा घटक आणि अभिमानी संघाच्यावतीने बेळगाव रेल्वे स्थानकासमोर क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांचे छायाचित्र ठेवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना या संघाचे राज्याध्यक्ष महेश शिगीहळ्ळी म्हणाले, बेळगाव रेल्वे स्थानकाला सिंधूर लक्ष्मण यांचे नाव देण्यात यावे. तसेच या रेल्वे स्थानकासमोर सिंधूर लक्ष्मण यांचा पुतळा स्थापन करण्यात यावा. आज सिंधूर लक्ष्मण यांची जयंती असून यानिमित्ताने आज रेल्वे स्थानकासमोर त्यांचे पूजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी सुरेश गवन्नावार, शिवा नायक, मारुती नायक, मंजुनाथ चिक्कलदिनी, अमित बंगायगोळ, विनोद होरकेरी आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *