कोगनोळी : येथील श्री वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल कोगनोळीचा सन 2001-2 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर. के. नवाळे हे होते.
सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचे पाय पूजन केले.
रामकृष्ण कांबळे यांनी स्वागत तर मीनाक्षी भाकरे यांनी प्रास्ताविक केले.
उपस्थित शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी ए. यु. कमते, व्ही. व्ही. कुलकर्णी, जी. एस. खावरे, एस. एन. अलगुरे, ए. पी. कुलकर्णी, आर. आर. डोंगरे, ए. बी. पाटील, ए. एम. दिवटे, एस. जी. माने, मुख्याध्यापक रविकिरण नवाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी विद्यार्थी अभिजीत गायकवाड, विनायक पाटील, अविनाश आलासे, भरत माणगावे, अझरुद्दीन मुल्ला, सचिन चिंचणे, सागर कोळसे, सागर शिंदे, उत्तम कुंभार, राजेंद्र कागले, पोपट खोत, सारिका मगदूम, डॉक्टर नूतन चौगुले, शिल्पा आयवाळे, पूजा पाटील, वैशाली दिवटे, वैशाली पाटील, सरिता पवार, माधुरी सोळांकूरे, रंजना काशीद, वैशाली बुदिहाळे यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते.
शालन दिवटे यांनी सूत्रसंचालन तर राजश्री निर्वाणे यांनी आभार मानले.