मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप
बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
दिल्ली न्यायालयात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
फेडरल प्रोब एजन्सीने सप्टेंबर २०१८ मध्ये शिवकुमार, नवी दिल्लीतील कर्नाटक भवनातील कर्मचारी ए हौमंतय्या आणि इतर लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. हा खटला आयकर विभागाच्या आरोपपत्रावर आधारित होता, जो शिवकुमार आणि इतरांविरुद्ध कथित करचोरी आणि हवाला व्यवहारासाठी बंगळूर येथील न्यायालयात दाखल करण्यात आला होता.
आयकर विभागाने शिवकुमार आणि त्यांचा सहकारी एस. के. शर्मा यांच्यावर तीन आरोपींच्या मदतीने ‘हवाला’ चॅनलद्वारे नियमितपणे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड वाहतूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ६० वर्षीय शिवकुमार यांना २०१९ मध्ये ईडीने अटक केली होती आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक लोक आणि सहकारी यांची एजन्सीने चौकशी केली होती.
कर्नाटकचे माजी कॅबिनेट मंत्री असलेले काँग्रेस नेते मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत.
शिवकुमार यांच्यावर मनी लाँड्रिंग तसेच बेहिशेबी मालमत्ता आणि बेनामी संपत्तीचे आरोप आहेत. त्याच्याकडे ८०० कोटी रुपयांची संपत्ती असण्यासोबतच ३०० बँक खाती असल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेत्यावर आपल्या मुलीच्या नावावर १०८ कोटी रुपयांचे अवैध व्यवहार केल्याचा आरोप आहे.
त्यांच्या जामिनाच्या सुनावणीदरम्यान, ईडीने न्यायालयाला सांगितले होते, की शिवकुमार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर ३०० हून अधिक स्थावर मालमत्ता आणि लाँड्रिंग मनीसह बेकायदेशीरपणे संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे.