संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगडवासीयांचे ग्रामदैवत
श्री. मरगुबाई देवीची यात्रा मंगळवार दिनांक २४ मे २०२२ धार्मिक कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. वल्लभगड किल्ल्याच्या उतरेकडच्या पायथ्याशी पुर्वाभिमुख असलेले श्री. मरगुबाई देवीचे मंदिर वल्लभगडवासियांचे जागृत देवस्थान आहे. सोमवारी मल्लीकार्जुन, श्री बसवेश्वर मुर्तीस अभिषेक घालून गावातून पालखी मिरवाणुकी काढण्यात आली. मंगळवारी पहाटे मरगुबाई देवीची पुजा नैवेद्य, दंडवत आदी धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने पार पाडण्यात आले. पूर्वी मरगुबाई देवीचे मंदिर साधे कौलारु होते. आता ग्रामस्थांच्या वर्गनीतुन मंदिराचा जीर्णोद्वर करण्यात आला आहे.
ग्रामदेवीचा नित्यपुजेचा मान गुरव व हिरेमठ घरार्याण्याकडे आहे. यात्रोत्सवात अबालवृध्दांनी मरगुबाई देवीचे दर्शन घेऊन पुनित होण्याचे कार्य केले. वल्लभगडावरील मरगुबाई यात्रेदिवशी सायंकाळी गावचे खातेदार पाटील, हवलदार व प्रतिष्टीत व्यक्ती, पंचमंडळी व ग्रामस्थ वाजत गाजत थळोबा मंदिराकडे जाऊन तेथे थळोबा ग्रामदेवाची पुजा केली. दशरथ पुजारी यांच्याकडुन देवाला गार्हाने घातले. भक्तगण, ग्रामस्थ, पॆ-पाहुण्यांनी श्री. मरगुबाई देवीच्या पुजाविधी कार्यक्रमात आपला सहभाग दर्शविला. खातेदार पाटील यांच्या हस्ते पूजाविधी कार्यक्रम पार पडलायात्रेनिमित्त मनोरंजणाचे कार्यक्रमही पार पडले. यात्रोत्सवात कर्नाटक, महाराष्ट्रातून लाखो भाविक सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले. शिवकालीन वल्लभगडात सिध्देश्वर मंदिर, बसवेश्वर मंदिर, थोळोबा मंदिर, रामलिंग मंदिर, हरिद्रादेवी मंदिर, लक्ष्मी मंदिर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर, सिद्राया मंदिर, राम मंदिर आहे. वल्लभगडातील लोक शुभ कार्य करताना गुरवाकडून देवीला नवस बोलून कार्याची सुरवात करतात. देवीला तांदूळ, नारळ, अगरबत्ती, कापूर, साखर (प्रसाद), वातीला तेल घालण्याची प्रथा आजही कायम आहे. मरगुबाई मंदीर हे किल्ले वल्लभगडाच्या कपारीत आहे. मंदिरातील गाभारा पुरातन पध्दतीचा असून मंदिरासमोर दीपमाळ आहे. दीपमाळेची उंची ३० फुट असून मंदिराभोवती गर्द वनराई आहे. देवीची मे महिन्यातील चार मंगळवारी पूजा बांधली जाते व पाचव्या मंगळवारी यात्रा होते. हाच दिवस यात्रेचा समजला जातो.
पूर्वापार चालत आलेल्या रुढीं परंपरा वल्लभगडवासिय आजही जोपासना करताहेत. हुक्केरी तालुक्यात वल्लभगड मरगुबाईदेवीची यात्रा आदर्श समजली जाते. यात्रा महोत्सवात संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील हरगापूर ग्रामपंचायत अध्यक्ष रवी शेलार, माजी अध्यक्ष पवन पाटील, यात्रा पंचकमिटीचे सदस्य ग्रामस्थ, भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …