निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस प्रमुख संजीव पाटील यांचा येथील कर्नाटक राज्य स्वराज्य रक्षक प्रतिष्ठान यांच्यामार्फत स्वराज्य रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी निपाणी भागातील कायदा व सुव्यवस्था आणखीन सुरळीत करण्याची विनंती केली. त्यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष उत्तम कामते, उपाध्यक्ष विजय कामते, शैलेश चव्हाण, रुपेश तोडकर,ओंकार भादुले, करण शिंदे, सुधाकर पाटील, गौरव पाटील, आदर्श पाटील, साहिल वडुर, सचिन पाटील, केतन पाटील, श्री. पाटील, शुभम चौगुले, लखन शहाबाज मुल्ला, प्रज्वल पाटील, अभिजित परीट यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
निपाणी सीमेवर कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले!
Spread the love निपाणी : दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात …